सकाळ डिजिटल टीम
मराठी इंडस्ट्रीमधील एव्हरग्रीन अभिनेत्री अश्विनी भावे. 'घरत गणपती' हा त्यांचा आगामी सिनेमा खूप गाजतोय. या सिनेमाच्या निमित्ताने त्यांनी अनेक मुलाखती दिल्या आहेत.
अश्विनी भावे यांनी आजवर अनेक मराठी आणि बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलंय. पण त्यांचा साधेपणा आजही अनेकांना भावतो.
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या घरातील संस्कारांविषयी भरभरून भाष्य केलं. आई-बाबांच्या संस्कारांमुळेच मी हा टप्पा गाठू शकले असं त्या यावेळी म्हणाल्या.
" सिनेविश्वात काम करणं हे माझं करिअर होतं. पण घरी आल्यावर मी तीच मध्यमवर्गीय संस्कारात वाढलेली मुलगी होते. मी कधीच त्याची हवा माझ्या डोक्यात जाऊ दिली नाही."
तर त्या कधीच पार्टी कल्चर मध्ये रमल्या नसल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. "काम झालं कि निघून जायचं हाच माझा कायम नियम होता" असंही त्या म्हणाल्या.
अश्विनी यांनी किशोर बोपर्डीकर यांच्याशी लग्न केलं. किशोर हे अमेरिकस्थित बिझनेसमन आहेत.
त्यांच्या लग्नाचा खास किस्सा त्यांनी मुलाखतीत शेअर केला. त्या म्हणाल्या,"मी माझ्या लग्नाच्या दिवशी संपूर्ण घराचा केर काढला. त्यावेळी मुंबईमध्ये खूप पाऊस पडत होता. घरात पाहुणे येणार होते तेव्हा मी संपूर्ण केर काढला. "
सोशल मीडियावर अश्विनी यांची ही मुलाखत खूप गाजतेय.