धनश्री भावसार-बगाडे
निसर्ग माणसाला कायमच संकेत देत असतो. काय शुभ आणि काय अशुभ हे निसर्ग त्या घटनांमधून सांगत असतो.
काही तज्ज्ञांच्या मते हे काम करावे की, नाही याचे संकेत निसर्ग देत असतो. ते आपण समजून घेणे गरजेचे असते.
घरातून निघताना विड्याचे पान, मासे, हत्ती, अंत्ययात्रा दिसणे किंवा मंदिराची घंटी ऐकू येणे शुभ मानले जाते. याचा अर्थ तुमचे काम यशस्वीरित्या पुर्ण होईल असा संकेत समजला जातो.
रस्त्यात पैसे पडलेले दिसणे हा शुभसंकेत समजला जातो. पण यातही दोन प्रकार असतात. जर नाणी दिसली तर तुमचे काम व्हायला वेळ लागेल असा संकेत समजला जातो.
तेच जर नोट पडलेली दिसली तर समजावे की महत्वाची रखडलेली कामे पूर्ण होतील.
घरातून निघताच भिकारी दिसले तर हा शुभ संकेत समजला जातो. हा भाग्योदयाचा संकेत असतो. भिकाऱ्याला दान जरूर करावे.
घरातून कामाला निघताना पेन, रुमाल विसणे अशुभ संकेत मानला जातो. ऑफीसमध्ये वाद होण्याचे ते लक्षण समजले जाते.
घरातून निघताना शिंका येणे हे अशुभ मानलं जातं. पण दोन आणि दोन पेक्षा जास्त शिंका आल्यातर मात्र शुभ मानलं जातं.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.