धनश्री भावसार-बगाडे
ज्योतिषशास्त्रात बुध ग्रह बुद्धीमत्ता, तार्कीक विचार आणि संवाद कौशल्याचा कारक ग्रह मानला जातो. हा ग्रह कन्या आणि मिथून राशीचा स्वामी आहे.
दि. २४ ऑगस्टला रात्री १२ वाजून ५२ मिनीटांनी बुध सिंह राशीत वक्री होईल. यामुळे काही राशींना अनपेक्षित फळं मिळणार आहेत.
हा वक्री बुध मिथून राशीसाठी सौभाग्य घेऊन येणार आहे. अचानक धनलाभाची शक्यता. भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होऊ शकेल.
यामुळे या राशींची आर्थिकस्थिती सुधारेल. अडकलेली कामे व पैसा मार्गी लागेल. कुटुंब व मित्रपरिवाराचे सहकार्य लाभेल.
या काळात नशीब कन्या राशीच्या लोकांबरोबर आहे असं म्हणायला हरकत नाही. करिअरमध्ये नव्या संधी व उत्पन्नाचे नवे स्रोत मिळण्याची शक्यता.
सगळी परिस्थिती तुमच्या बाजूने असणार आहे. आर्थिक सुबत्ता लाभण्याची दाट शक्यका.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळा अनुकूल असणार आहे. यात व्यावसायिक क्षेत्रात यश व वृद्धी मिळण्याची शक्यता.
तुम्हाला त्रस्त करणाऱ्या आर्थिक अडचणी दूर होती. आत्मविश्वास वाढेल.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.