Anuradha Vipat
कंगना रणौत आणि चिराग पासवान यांनी खासदारकीची शपथ घेतली आहे
शपथ घेतल्यानंतर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते .
यानंतर दोघांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा देखील रंगल्या आहेत.
आता नुकताच झालेल्या मुलाखतीत कंगनाने चिराग पासवानबाबत मोठा खुलासा केला आहे.
चिराग पासवानबद्दल कंगना म्हणाली, कमीत कमी आम्हाला संसदेत तरी सोडा, मी चिराग यांना गेल्या अनेक वर्षांपासून ओळखते.
पुढे कंगना म्हणाली, आम्ही चांगले मित्र आहोत. त्यांनी मला एक – दोनवेळा विनोदाने हसवलं आहे. तेव्हापासून अनेक चर्चा रंगल्या आहेत.
आता मला पाहिल्यानंतर चिराग स्वतःच रस्ता बदलतात असं देखील कंगना म्हणाली