Anuradha Vipat
गायक कैलाश खेर आज लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे.
कैलाश खेरचा जन्म दिल्लीत झाला आहे. बालपणीपासूनच गायक होण्याची त्याची इच्छा होती.
वयाच्या 14 व्या वर्षी कैलाशने घर सोडलं होतं. घरातून बाहेर पडल्यानंतर कैलाश क्लासिकल आणि फोक म्यूझिक शिकला
एका मुलाखतीत कैलाश खेर म्हणाला होता की,"जगण्यासाठी मी वेगवेगळी कामे केली आहेत.उद्योगक्षेत्रात आलेल्या अपयशामुळे मी पंडित होऊन ऋषिकेशला गेलो. काहीतरी गमावल्यासारखं मला सारखं वाटत असे.
एक दिवस मी गंगा नदीत आयुष्य संपावण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी एका व्यक्तीने मला वाचवलं असही तो पुढे बोलताना म्हणाला होता
मीडिया रिपोर्टनुसार, कैलाश खेर एका गाण्याचे 10 लाख रुपये मानधन घेतो.