गौतम बुद्धाला वयाच्या कितव्या वर्षी ज्ञानप्राप्ती झाली?

Amit Ujagare (अमित उजागरे)

कर्मकांड, दैववाद नाकारणाऱ्या भारतीय नास्तिक परंपरेतील एक महान व्यक्तीमत्व म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्ध.

Gautam Buddha

सिद्धार्थ गौतमाचा जन्म इसवी सन पूर्व ५६३ मध्ये झाला होता. तर महापरिनिर्वाण इसपूर्व ४८३ मध्ये झालं.

Gautam Buddha

सिद्धार्थचा जन्म हा शाक्य कुळातील राजा शुद्धोधन आणि महाराणी महामाया यांच्या पोटी नेपाळच्या लुंबिनी इथं झाला होता.

Gautam Buddha

आईच्या निधनानंतर मावशी गौतमीनं त्याच पालनपोषण केलं म्हणून त्याला गौतम असही संबोधलं जातं, तो सुखसंपन्न कुटुंबातील राजपुत्र होता.

Gautam Buddha

लहानपणापासून प्रेमळ हृदयाच्या असलेला गौतम पुढे बुद्ध झाला. कारण कुठल्याही ऐकीव माहितीपेक्षा मनुष्याच्या जीवनातील सत्य स्वतः जाणून घेण्यासाठी त्यानं कठोर तपश्चर्या केली.

Gautam Buddha

त्यासाठी वयाच्या २९ व्या वर्षी सिद्धार्थ गौतम ज्ञानाच्या शोधात घराबाहेर पडला. ६ वर्षे अन्नपाणी त्यागून कठोर तपश्चर्येनंतरही त्याला ज्ञान प्राप्ती झाली नाही.

Gautam Buddha

त्यानंतर जंगलात एका पिंपळाच्या झाडाखाली कुठल्याही उपवासाशिवाय त्यांनी मनुष्याच्या सुख-दुःख-इर्षा-तृष्णा या बाबींच्या मागचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला.

Gautam Buddha

अखेर त्याला वैशाखी पौर्णिमेच्या रात्री पिंपळाच्या झाडाखाली कुठल्याही कर्मकांडाशिवाय आणि दैववादाशिवाय जीवनातील या मुलभूत प्रश्नांची उत्तर मिळाली, म्हणजेच त्याला ज्ञानप्राप्ती झाली.

Gautam Buddha

ज्ञानप्राप्तीवेळी गौतमाचं वय ३५ वर्षे होतं. ज्ञानप्राप्तीनंतर तो गौतम....गौतम बुद्ध झाला.

Gautam Buddha

ज्या ठिकाणी त्या बुद्धत्व प्राप्त झालं ते बिहारमधील गया हे ठिकाण होतं. त्याला पुढे बोधगया संबोधलं जाऊ लागलं. तसेच पिंपळाच्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाल्यानं त्याला बोधीवृक्ष संबेधलं गेलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Buddha