आशुतोष मसगौंडे
नवी मुंबईला जोडणाऱ्या सर्वाधिक लांबीच्या अटल सेतूवरून गेल्या सात महिन्यांत ५० लाखांहून अधिक गाड्या धावल्या आहेत.
जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान पुलावरून ५० लाख चार हजार ३५० गाड्या धावल्या. यात बेस्ट, एनएमएमटी आणि एसटीच्या शिवनेरी गाड्यांचा समावेश आहे.
हा पूल नवी मुंबईच्या न्हावा शेवाला दक्षिण मुंबईच्या शिवडीला जोडतो.
सहा लेनच्या या पुलाची लांबी 21.8 किलोमीटर आहे.
अटल सेतूचा 16.6 किलोमीटरचा भाग पाण्यावर तर 5.5 किलोमीटरचा भाग एलिव्हेटेड आहे.
अटल सेतूच्या निर्मितीसाठी तब्बल 17480 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
अटल सेतूवर वेगाची मर्यादा शंभर किलोमीटर प्रतितास इतकी ठेवली आहे.
या अटल सेतूचे बांधकाम दहा देशांच्या तज्ज्ञांच्या मदतीने १५ हजार कौशल्य कामगारांच्या मदतीने पूर्ण केले आहे.
या पुलावरून वाहतूक करण्यासाठी मोटार, टॅक्सी, हलक्या वजनाची वाहने, मिनी बस, लहान ट्रक, अवजड वाहनांना परवानगी आहे.
अटल सेतूवर दुचाकी, तीन चाकी, ऑटोरिक्षा, ट्रॅक्टर, कमी वेगाच्या गाड्या, बैलगाडीला परवानगी नाही.
अटल सेतूवर मोटारीसाठी २५० रुपये टोल, तर रिटर्नसाठी ३७५ रुपये टोल आहे.
या सेतूमुळे मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानळावर वाहतूक करणे सोपे झाले आहे.
अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई प्रवास अवघ्या 20 मिनिटांचा झाला आहे.