Vaibhav Mane
अथर्वला तुम्ही इन्स्टाच्या रिल्स वरती आणि युट्युब वर अनेक वेळा पाहिलं असेल पण...
'स्थळ पुणे' हा टॅग त्याला कसा सुचला याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ?
अथर्वची पत्नी ऋचा सोबतचा सुंदर फोटो, सोशल मीडिया क्षेत्रात अथर्वने त्याच करिअर केले आणि त्याचं क्षेत्रात काम करणारी त्याला बायको मिळाली हे त्याच्या करिअरच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा आहे.
तुम्हाला काय वाटतंय 'स्थळ पुणे' त्याच्या डोक्यात कसे आले असेल ?
अथर्व मुळचा पुण्याचा आहे, हे वेगळ सांगायची गरज नाही, मराठीत एक म्हण आहे 'पुणे तिथे काय उणे' पुण्यातला माणूस म्हटल्यानंतर बारकाव्याने व्यवस्थित निरीक्षण करून कुठलीही गोष्ट पाहतो किंवा घेतो.
अथर्वने अनेक मराठी कलाकारांसोबत काम केले आहे .
अथर्व लहानपणापासून पुण्यात राहिला आहे. पुणेरी बाणा त्याच्या नसानसात भरलेला आहे आणि त्यामुळेच त्याला 'स्थळ पुणे' सुचलं
राज ठाकरे सुद्धा अथर्वच्या विनोदाचे फॅन आहेत, कारण त्यांनी एका सदिच्छा भेटत त्याचा आवर्जून उल्लेख केला होता.
'स्थळ पुणे' या टॅगलाईनवरून अनेकजन आता स्थळ त्यांच्या जिल्ह्याचे नाव देऊन ते रिल्स बनवतात.
अथर्वने सात लाखं फॉलोअरचा टप्पा पूर्ण केला, तेव्हा अथर्वला विचारलं की इतके फॉलोअर होण्याचं रहस्य काय ? तो म्हणाला चांगलं झाल्यानंतर सगळेच येतात पण त्याचं खरं श्रेय माझं मलाच आहे.
अथर्व ने अनेक गायनाचे कार्यक्रम सुद्धा केले आहेत, सोशल मीडिया हा केवळ टाईमपास नाही तर उत्पन्नाचा उत्तम साधन आहे फक्त त्याच्यामध्ये शिक्षण घेतलं पाहिजे आणि सकारात्मक दृष्टिकोनाने त्याकडे पाहिलं पाहिजे.
अबोल आणि शांत स्वभावाचा अथर्व जेव्हा विनोद करतो, तेव्हा तो किती खोडसळ आहे हे कळतं.
तो आत्ताच्या धडपडणाऱ्या तरुणांसाठी आदर्श आहे .
काही महिन्यांपूर्वी अथर्व आणि ऋचा चा विवाह झाला आहे.
अथर्व आणि त्याचे कुटुंबीय.
अथर्वचे बीकॉम बीएमसीसी पुणे येथून झाले आहे, त्याच्या पत्नीचे म्हणजे ऋचाचे बीसीए झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.