Sudesh
एथर कंपनीने मोठ्या गॅपनंतर आपली नवी इलेट्रिक स्कूटर लाँच केली आहे. ही एक फॅमिली स्कूटर आहे.
Ather Rizta असं या स्कूटरचं नाव आहे. यामध्ये भरपूर स्पेस आणि कंफर्ट यावर विशेष लक्ष देण्यात आलं आहे.
या स्कूटरची सुरुवातीची किंमत 1.10 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. याच्या टॉप व्हेरियंटची किंमत 1.45 लाख रुपये आहे.
Ather Ritza चे दोन व्हेरियंट लाँच करण्यात आले आहेत. यातील एका व्हेरियंटमध्ये 2.9kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. याची रेंज सुमारे 123 किलोमीटर आहे. दुसऱ्या व्हेरियंटमध्ये 3.7kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. याची रेंज 165 किलोमीटर आहे.
टॉप एंड व्हर्जनमध्ये TFT डिस्प्ले मिळतो. तसंच यामध्ये दोन रायडिंग मोड्स देण्यात आले आहेत. यासोबतच 5 वर्षांची वॉरंटी, IP67 रेटिंग आणि 400mm वॉटर व्हेंडिंग कपॅसिटी, मल्टिपर्पज चार्जर, इनबिल्ट गुगल मॅप्स, ट्रॅक्शन कंट्रोल असे फीचर्सही या स्कूटरमध्ये दिले आहेत.
आरामदायक राईडसाठी यामध्ये मोठं सीट दिलं आहे. तर फ्रंट आणि अंडरसीट स्टोरेज मिळून एकूण 56 लीटरचा स्टोरेज स्पेस मिळतो.
ही स्कूटर तुम्ही एथरच्या अधिकृत शोरुम आणि वेबसाईटवरुन बुक करू शकता. याची डिलिव्हरी जुलै महिन्यापासून सुरू होणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे.