सकाळ ऑनलाईन
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरे यांची कर्करोगाशी दीर्घ झुंज आज अखेर संपली.
परचुरे यांनी वयाच्या ५७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पण त्यांच्या एका आनंदाच्या क्षणी दुःखाचा डोंगरही कोसळला.
अतुल परचुरे लग्नाचा २५वा वाढदिवस साजरा करण्यासाठी न्यूझीलंडला गेले होते. तिथं त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं.
अत्यंत फुडी असलेल्या परचुरे यांची न्यूझीलंडच्या दौऱ्यात अचानक खाण्यापिण्यावरील वासना उडाली.
काहीही खायचं म्हटलं की त्यांना नकोसं वाटे, त्यानंतर काही दिवसांनी परचुरेंना कावीळ झाली.
एका डॉक्टर मित्राच्या सांगण्यावरुन त्यांनी पोटाची सोनोग्राफी केली. त्यानंतर डॉक्टरांच्या चेहऱ्यावरील हावभावावरुन त्यांना काविळीपेक्षा काहीतरी गंभीर आजार झाल्याचं त्यांना जाणवलं.
‘मित्र म्हणे’ पॉडकास्टमध्ये अतुल परचुरे यांनी या गोष्टीचा खुलासा केला होता.
यावेळी त्यांनी सर्वांना एक महत्वाची गोष्ट आवर्जुन सांगितली होती. ती म्हणजे स्वतःसह कुटुंबाची मेडिक्लेम पॉलिसी असणं खूपच गरजेचं आहे.
कारण मोठ्या आजाराच्या काळात हीच पॉलिसी तुम्हाला मोठा आर्थिक आधार देते, पैशाची गरज भागल्यानं तुमचं मनही स्थिर राहतं, असं त्यांनी म्हटलं होतं.