Pranali Kodre
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स 8 मे रोजी त्याचा वाढदिवस साजरा करतो. त्याचा जन्म 8 मे 1993 रोजी वेस्टमेड, सिडनी येथे झाला.
पाच भावंडांमध्ये जन्मलेल्या कमिन्ससाठी लहानपणी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली आदर्श होता.
कमिन्सच्या उजव्या हाताचे मधले बोट लहानपणी तुटले होते. तो चार वर्षांचा असताना बहिणीला लॉलीपॉप दाखवत असताना तिने बाथरुमचे दार जोरात लावले, त्यावेळी त्या दारात अडकून कमिन्सचे बोट तुटले.
त्याचमुळे कमिन्स त्याच तुटलेल्या बोटासह गोलंदाजी करतो, महत्त्वाचे म्हणजे त्याचा बोट तुटले असल्याने गोलंदाजी करताना फायदाही होतो.
कमिन्सचे आयसीसीच्या गोलंदाजी क्रमवारीत अव्वल क्रमांक हे सर्वोच्च स्थान आहे.
कमिन्सने आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाकडून मोठे यश मिळवले आहे. त्याने कर्णधार म्हणून 2023 वनडे वर्ल्डकप, 2021-23 टेस्ट चॅम्पियशीप जिंकली. त्याचबरोबर 2023 मध्ये ऍशेससही राखण्यात कमिन्सला यश मिळाले.
इतकेच नाही, तर कमिन्स 2015 साली वनडे वर्ल्डकप जिंकणाऱ्या आणि 2021 साली टी20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचाही भाग होता.
त्याला 2024 आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व देण्यात आले. विशेष म्हणजे या आयपीएल लिलावात 20 कोटींची बोली मिळवणारा तो पहिलाच खेळाडूही आहे.
त्याने आयपीएल 2024 मधून पहिल्यांदाच टी20 क्रिकेटमध्ये नेतृत्व केले.
कमिन्सने त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत 62 कसोटी सामन्यांत 269 विकेट्स घेतल्या आहेत, तर 1295 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 88 वनडेत 141 विकेट्स घेतल्यात, तर आंतरराष्ट्रीय टी20मध्ये त्याने 52 सामन्यांत 57 विकेट्स घेतल्यात.