अनिरुद्ध संकपाळ
ऑस्ट्रेलिया स्कॉटलँडविरूद्धच्या सामन्यात मुद्दाम हरणार असं चित्र निर्माण झालं होतं. याला कांगारूंच्या काही खेळाडूंची वक्तव्यच कारणीभूत होती.
यानंतर खेळ भावना हा विषय चर्चेत आला होता. जर ऑस्ट्रेलिया स्कॉटलँडकडून हरली असती तर इंग्लंड सुपर 8 मधून बाहेर फेकली गेली असती.
त्यामुळं ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलँड सामन्यात सर्वांची नजर ऑसी खेळाडू काय करतात याच्यावरच होती.
वनडे वर्ल्डकप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करणाऱ्या स्कॉटलँडला 180 धावांपर्यंत मजल मारू दिली.
त्यात ऑस्ट्रेलियाने तब्बल 6 कॅच सोडले. त्यामुळे सर्वांच्याच मनात शंकेची पाल चुकचुकली. इंग्लंडच्या संघाला तर घाम फुटला होता.
कांगारूंनी रेकॉर्डच तसा खतरनाक केला होता. त्यांनी टी 20 वर्ल्डकपच्या इतिहासात एका सामन्यात सर्वाधिक कॅच सोडण्याचा विक्रम आपल्या नावावर करून घेतला होता.
कांगारूंनी स्कॉटलँडचे 181 धावांचे आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात 19.4 षटकात पार करत सामना जिंकला. त्यानंतर इंग्लंडचा जीव भांड्यात पडला.