Pranali Kodre
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ५ कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होणारे सामने अनुक्रमे पर्थ, ऍडलेड, ब्रिस्बेन, मेलबर्न आणि सिडनी या शहरांमध्ये होणार आहेत.
दरम्यान, हे पाच सामने कोणत्या मैदानांवर होणार आहेत, ते जाणून घेऊ.
पहिला सामना पर्थमधील ऑप्टस स्टेडियम (Perth Stadium) येथे २२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ७.५० वाजता सुरुवात होईल.
दुसरा सामना दिवस-रात्र कसोटी सामना होणार असून ऍडलेडमधील ऍडलेड (Adelaide) ओव्हल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना ६ ते १० डिसेंबर दरम्यान होणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.३० वाजता सुरु होईल.
तिसरा सामना ब्रिस्बेनमधील (Brisbane) द गॅबा स्टेडियममध्ये १४ ते १८ डिसेंबर दरम्यान होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ५.५० वाजता सुरू होईल.
चौथा सामना मेलबर्नमधील (Melbourne) मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड येथे २६ ते ३० डिसेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ५ वाजता चालू होईल.
पाचवा सामना सिडनीमधील (Sydney) सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये नवीन वर्षाच्य सुरुवातीलाच ३ ते ७ जानेवारी २०२५ दरम्यान खेळवण्यात येईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ५ वाजता चालू होणार आहे.