Anuradha Vipat
अभिनेत्री अविका गौर आता तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
अविकाने भारती सिंग आणि हर्ष लिम्बाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये मोठा खुलासा केला आहे.
पॉडकास्टमध्ये अविका म्हणाली की, ‘मी गेल्या चार वर्षांपासून मिलिंद चंदवानी याला डेट करत आहे.
जेव्हा आमच्या नात्याची सुरुवात झाली तेव्हा जवळपास 6 महिने आम्ही फ्रेंडझोनमध्ये होतो असंही पुढे अविका म्हणाली
‘माझ्या आणि मिलिंदच्या वयात फार अंतर आहे. त्यामुळे मी माझी वेळ घेतल्यानंतर लग्नाचा विचार करावा असं त्याचं म्हणणं आहे असंही यावेळी अविकाने स्पष्ट केलं
अविका कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.
‘सुसराल सिमर का’ मालिकेतील अभिनेता मनिष रायसिंगन याच्यासोबत देखील अविकाच्या नात्याची चर्चा रंगली आहे