अविनाश नारकर यांनी शेअर केला नाटकादरम्यान घडलेला मजेशार किस्सा

Anuradha Vipat

अविनाश नारकर

अविनाश नारकर यांनी आपल्या दमदार अभिनयाने अनेक नाटक, मालिका आणि चित्रपट गाजवले

पुरस्कार सोहळ्याला हजेरी

नुकतीच अविनाश नारकर यांनी ‘झी नाट्य गौरव’ पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती

सहकलाकाराची गंमत

यावेळी अभिनेते अविनाश नारकर यांनी त्यांच्या एका नाटकाची आणि त्या नाटकातल्या सहकलाकाराची एक गंमत सांगितली आहे. 

मजेशीर किस्सा

अविनाश नारकर म्हणाले की, ‘त्यावेळी आम्ही ‘रणांगण’ नावाचे नाटक करत होतो. त्या नाटकाच्या वेळी एक इतका मजेशीर किस्सा घडला की, जो मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही

नक्की काय झालं?

पुढे अविनाश नारकर म्हणाले की, या प्रयोगाच्या दरम्यान अचानक नानासाहेब माझ्या दिशेने पटपट चालत आले. मला गच्च धरून त्यांनी माझ्या हातात तलवार दिली आणि निघून गेले, आता हे अचानक सीनमधूनच आत कसे काय निघून गेले? असा प्रश्न मला पडला होता. म्हणून, मी आत जाऊन त्यांना विचारलं नक्की काय झालं?

आणि म्हणाले

‘त्यावेळी ते उठले आणि म्हणाले माफ करा. पण, काय सांगू... मी जेव्हा सिंहासनावरून उठलो, तेव्हा माझ्या पायजाम्याची नाडी तुटली आणि पायजामा खाली सरकू लागला होता.

लाल रंगाच्या साडीत खुललं श्रुतीचं सौंदर्य

येथे क्लिक करा