अन् अवनी ठरली एकटीने लढाऊ विमान उडविणारी पहिली भारतीय महिला

Anuradha Vipat

नवा इतिहास रचला

भारतीय वायुसेनेतील फ्लाइंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी हिने मिग-21 बायसन हे लढाऊ विमान एकटीने उडवून एक नवा इतिहासच रचला आहे.

Flying Officer Avni Chaturvedi

पहिली भारतीय महिला

१९ फेब्रवारी २०१८ च्या सकाळी अवनीने गुजरातच्या जामनगर लष्करी हवाई तळावरुन उड्डाण घेतले आणि ही मोहीम यशस्वी केली. एकटीने लढाऊ विमान उडविणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मानही तिने मिळवला.

Flying Officer Avni Chaturvedi

लँडिंग आणि टेक ऑफ स्पीड

अवनीने उडविलेले मिग-21 बायसन हे लढाऊ विमान जगातील सर्वाधिक लँडिंग आणि टेक ऑफ स्पीड असणारे विमान आहे.

Flying Officer Avni Chaturvedi

जन्म

मध्य प्रदेशच्या शहडोलची येथील अवनी चतुर्वेदीचा जन्म २७ ऑक्टोबर १९९३ रोजी दिनकर चतुर्वेदी ह्यांच्या घरी झाला.

Flying Officer Avni Chaturvedi

बीटेक पर्यंतचे शिक्षण

तिने तिचे प्राथमिक शिक्षण आपल्या गावीच पूर्ण केलं. १० वी आणि १२ ह्या दोन्ही बोर्डाच्या परीक्षांत अवनी आपल्या शाळेतून पहिली आली होती. यानंतर राजस्थानच्या वनस्थली विद्यापीठातून त्यांनी बीटेक पर्यंतचे शिक्षण घेतले.

Flying Officer Avni Chaturvedi

भारतीय सेना

अवनीचे वडील म्हणजेच दिनकर चतुर्वेदी हे देखील स्वतः एक इंजिनीअर आहेत. त्यांची आई गृहिणी आहे. तर मोठा भाऊ हा भारतीय सेनेत रुजू आहे.

Flying Officer Avni Chaturvedi

कठोर परिश्रम

इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यावर अवनीने एयरफोर्सच्या टेक्निकल सर्विसमध्ये रुजू होण्यासाठी परीक्षा दिली. ती परीक्षा उत्तीर्णही झाली. ह्यासाठी तिने कठोर परिश्रम घेतले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flying Officer Avni Chaturvedi