सकाळ डिजिटल टीम
लोकांसाठी 'मोबाईल' त्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. लोक त्यांचा फोन टॉयलेटमध्येही घेऊन जातात.
बरेच लोक त्यांचा मोबाईल टॉयलेटमध्ये घेऊन जातात आणि तासन्तास तिथं बसून राहतात. हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
जर तुम्हीही टॉयलेटमध्ये बसून मोबाईल वापरत असाल, तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.
टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन बसल्याने लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.
तासन्तास मोबाईल वापरल्याने बद्धकोष्ठता, आतड्यांसंबंधी समस्या आणि मूळव्याध होऊ शकतात.
टॉयलेटमध्ये बसून फोन वापरताना Posture योग्य नसते. अशा परिस्थितीत मान आणि पाठदुखी होऊ शकते.