सकाळ डिजिटल टीम
अयोध्येत राम मंदिर तयार झाले असून आज (सोमवार) 8000 प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अभिषेक सोहळा पार पडणार आहे. पण, यादरम्यान ज्या व्यक्तीला लोक आजचा रामाचा 'हनुमान' म्हणतात, त्या व्यक्तीबद्दल जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
केवळ भारतच नाही तर संपूर्ण जग या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी सज्ज झालं आहे. आज अयोध्येत प्रभू रामांचा अभिषेक सोहळा होणार आहे.
राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा पाहण्यासाठी 8 हजार लोक अयोध्येला पोहोचत आहेत. पण, कोर्टात रामजींच्या मंदिरासाठी लढणारा तो चेहरा आजही सर्वांच्या मनात कायम आहे.
या चेहऱ्याचं नाव आहे ज्येष्ठ वकील के पारासरण. ज्यांनी सर्वोच्च न्यायालयात अयोध्या जन्मभूमी खटल्यात हिंदू बाजूचं प्रतिनिधित्व केलं आणि खटला पूर्ण जोमानं लढून जिंकला.
ते वर्ष होतं 2019 आणि तारीख होती 9 नोव्हेंबर.. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने हिंदूंच्या बाजूने प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्येष्ठ वकील परासरण यांच्या बाजूनं निकाल दिला.
के. पारासरण यांचे राम मंदिराशी असलेले नाते केवळ व्यावसायिकच नव्हते, तर मनापासूनही होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.