Chinmay Jagtap
डायपरच्या वापरामुळे मुलांची किडनी खराब होऊ शकते असा एक धक्कादायक अहवाल सोशल मीडियात व्हायरल होतोय.
दिल्ली एम्सच्या बालरोगतज्ज्ञ विभागनं हा अहवाल दिल्याचा दावा केला जातोय.
लहान मुलांचे कपडे खराब होऊ नयेत त्यांनी अंथरूण ओलं करू नये यासाठी आपण सर्रासपणे मुलांना डायपर घालतो. जर्नल ऑफ एन्व्हार्यमेंटल ऑफ सायन्सनमधून डिस्पोजिबल डायपरबाबत यापूर्वीही इशारा देण्यात आला होता.
डायपर दिवसातून किती वेळा बदलण्यात यावं, बाळाला ते घट्ट होतंय का? किंवा बाळ कोणत्या मार्गानं शी-सू करतंय या गोष्टींबाबत पालकांना काहीच माहिती नसते. केवळ स्वत:चा त्रास टाळण्यासाठी ते डायपरच्या वापरावर भर देतात.
पालक स्वत:चा त्रास टाळण्यासाठी ते डायपरच्या वापरावर भर देतात. मात्र ही तात्पुरती सोय त्यांच्या मुलांच्या जिवावरही उठू शकते.
डायपरच्या वापरामुळे मुलांची किडनी खराब होऊ शकते. डायपर टाईट असेल तर किडनीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.डिस्पोजिल डायपरमध्ये प्रतिबंधित रसायन थॅलेटचा वापर होतो
डिस्पोजिबल डायपरमुळे छोट्या मुलांचं लिव्हर खराब होऊ शकतं. त्यांना त्वचेचे आजार होऊ शकतात. . मुलांना हार्मोन्ससंबंधित विकार होऊ शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.