सकाळ डिजिटल टीम
प्रवरा नदीच्या काठावर असलेल्या दायमाबाद येथे प्राचीन हडप्पा कालीन संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. त्यामध्ये बैलगाडा शर्यतीचा एक स्टॅच्यु सापडला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ही पुण्यातील लढाईत खिलार बैलांचा मोठ्या खुबीने वापर करुन शत्रुला नामोहरम केले होते.
बैलांच्या शिंगाना पेटवलेल्या मशाली बांधुन सोडल्याने शत्रुची दिशाभुल केली होती यामुळेच या ठिकाणाला दिवेघाट नाव पडले आहे.
पारंपारिक वारसा व शेतकर्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिले जाते.
बैलगाडा शर्यतीचे आवडीमुळे देशी गाय-बैलांचे संगोपन चांगल्या प्रकारे होते.
ग्रामीण भागात बैलाच्या मालकांसाठी ही अत्यंत प्रतिष्ठेची गोष्ट समजली जाते.
बैलगाडा शर्यतीत भाग घेण्यासाठी बैलांना प्रशिक्षण दिलं जातं.
बघ्यांसाठी पर्वणी असलेल्या बैलगाडा शर्यतींसाठी बैलांची वर्षभर खास काळजी घेतली जात असे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.