संतोष कानडे
बंजारा समाज हा संपूर्ण देशभरात तांड्यांमध्ये विभागून उपजीविका भागवणारा समाज आहे
भटक्या व विमुक्त जमातींमध्ये बंजारा समाजाचा समावेश होतो. यांची राज्यात साधारण दोन कोटी लोकसंख्या आहे
हडप्पा आणि मोहंजोदारोच्या सिंधू संस्कृतीमध्ये बंजारा समाजाचे पुरावे सापडलेले आहेत
त्याकाळी व्यापार करणारे गोर बंजारा समाजाचे लोक होते. वाणिज्य करणारे म्हणून त्यांना वनज म्हणत. त्यातूनच पुढे बंजारा शब्दाची निर्मिती झाली
बंजारा स्त्रीयांची आभूषणं ही सिंधू संस्कृतीची प्रतिकं असल्याचं अभ्यासक सांगतात
वाहतूक, दळणवळवण याच्याशी संबंधित कामं बंजारा समाज करी. अगदी मध्य युगापर्यंत ही जमात व्यापारी होती
याशिवाय लमाणी हा शब्द लवण शब्दापासून आला. लवण म्हणजे मीठ आणि मीठ वाहणारे लमाणी
भारतामध्ये १३९६ मध्ये पडलेल्या दुष्काळात बंजारा समाजाने चीन, तिबेट, ब्रह्मदेश, इराण, काबुल इथून धान्य आणून लोकांना जगवलं,त्यामुळे त्यांना प्रतिष्ठा मिळाली
आठराव्या शतकामध्ये इंग्रजांचं भारतात प्राबल्य वाढल्यामुळे दळणवळणाच्या सुविधा वाढल्या
पक्के रस्ते आणि त्यानंतर १८५३ साली आलेल्या रेल्वेमुळे बंजारा समाजाचा व्यवसाय धोक्यात आला
पुढे इंग्रजांनी जंगलातील गोंद चारोळी आणि मोळ्या विकण्यावर बंदी घातली, त्यामुळे बंजारा समाज देशोधडीला लागला
त्यामुळे बंजारा समाज गुन्हेगारीकडे वळला, स्वातंत्र्यानंतर १९५२ साली बंजारा समाजावरचा हा शिक्का पुसला गेला.
वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक हे महान नेते बंजारा समाजात होऊन गेले, त्यामुळे समाजाने प्रगती केली