Anuradha Vipat
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ने राहत्या घरात गणरायाची स्थापना केली आहे.
सोनालीने शाडूच्या मातीने स्वतः गणरायाची मुर्ती घडवली आहे.
सोनालीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने तिच्या भावना देखील व्यक्त केल्या आहे.
पोस्टमध्ये सोनाली म्हणत आहे की, दरवर्षी काहीतरी वेगळं करु असाच प्रयत्न असतो. मी आणि माझा भाऊ मिळून गणरायाची मुर्ती तयार करतो.
पुढे सोनालीने म्हटले आहे की, शाडूची माती आणि शंकराची पिंड आहे, त्याच्याबरोबर आमचा बालगणेशा आहे.
यावर्षी जरा सोपी आणि फार अवघड न करता छान मुर्ती करण्याचा प्रयत्न होता असं देखील सोनाली म्हणाली आहे.
पुढे सोनाली म्हणाली आहे की, वर्षभर प्रत्येकासोबत अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात. या सर्वांमध्ये वर्ष कसंही गेलं तरी गणेशोत्सव सारखाच असतो.