सकाळ डिजिटल टीम
लिंगायत धर्म संस्थापक, थोर समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांचे 12 व्या शतकात आध्यात्मिक, वैचारिक व सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यात मोठं योगदान आहे.
बसवण्णा यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी येथे सन ११३१ मध्ये वैशाख महिन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय दिनी झाला.
महात्मा बसवेश्वर हे वीरशैव लिंगायत धर्माचे संस्थापक व धर्मगुरू होते. थोर संत, महान कवी अन् सच्चे समाजसुधारक म्हणून त्यांची जनमानसात ख्याती होती.
बसवेश्वरांच्या आईचे नाव मादलांबिके तर वडिलांचे मादिराज. बसवेश्वरांच्या कालखंडात समाजामध्ये सर्वत्र कर्मकांड, दांभिकता, स्त्री-पुरुष असमानता, स्त्री दास्यत्व, वर्णभेद, जातीभेद या कुप्रथांचा बोलबाला होता.
मनुवादीप्रवृत्तीत जखडलेल्या कर्मकांडी समाजाला थेट आव्हान करत बसवेश्वरांनी वयाच्या ८ व्या वर्षी उपनयन संस्कारचे जानवे तोडून आपल्या मुंज विधीला नकार दिला.
बसवेश्वरांनी जातीपातीच्या भिंती गाडून चातुर्वर्ण्याला कडाडून विरोध करत, लिंगायत धर्माचा प्रचार करून सामाजिक समता प्रस्थापित केली.
दरम्यान, मादूलांबा (मादंबा) नामक मामाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाल्यावर त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे सुमारे २१ वर्षे वास्तव्य केले अन् तेथूनच त्यांनी वीरशैव लिंगायत धर्माचा पाया रचला.