Pranali Kodre
बिग बॉस मराठीचा पाचवा सिजन सध्या चांगलाच गाजत आहे. पण आठव्या आठवड्यात एक धक्कादायक घटना घडली.
या सिजनमधील स्पर्धक आर्या जाधव हिने टास्कदरम्यान निक्की तांबोळी हिच्या कानशिलात लगावली.
बिग बॉसच्या नियमानुसार घरात अशाप्रकारचा हिंसाचार करणे नियमभंग असल्याने आर्याला या आठवड्या भाऊच्या धक्क्यादरम्यान शिक्षा म्हणून बिग बॉसचं घर सोडावं लागलं.
दरम्यान, आर्याला अशाप्रकारे शो सोडावा लागल्याने तिचे चाहते मात्र अत्यंत नाराज असून या घटनेवर सध्या मोठ्या प्रमाणात चर्चाही होत आहे.
मात्र, तुम्हाला हे माहित आहे का की बिग बॉस मराठीच्या इतिहासात एखाद्या स्पर्धकाच्या कानखाली मारल्याने घर सोडावं लागणारी आर्या ही पहिलीच स्पर्धक नाही.
यापूर्वी शेफ पराग कान्हेरे यांनाही अशाप्रकारे बिग बॉसचं घर सोडावं लागलं होतं.
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिजनमध्ये पराग कान्हेरे स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. त्यांनीही त्या सिजनमधील दुसरी स्पर्धक नेहा शितोळी हिला मारल्याने शिक्षेस सामोरे जावे लागले होते.
त्यांनाही त्या घटनेनंतर सिजन तिथेच सोडावा लागला होता. त्यानंतर त्यांनी या शोवर बरीच टीका देखील केली होती.
दरम्यान, बिग बॉसच्या पाचव्या सिजनमध्ये आर्यानंतर याच आठवड्यात वैभव चव्हाण याचेही एव्हिक्शन झाले आहे. त्यामुळे आता घरात केवळ १० सदस्य राहिले आहेत.