अनिरुद्ध संकपाळ
रॉजर बिन्नींनी बेन स्टोक्सच्या कॅप्टन्सीवरून त्याला चांगलंच फैलावर घेतलं. त्यांनी भारतीय फरकीपटूंना आक्रमक फटके मारण्याऐवजी इंग्लंडने टिकून राहून मोठ्या धावा करणे अपेक्षित होतं असं वक्तव्य केलं.
बिन्नींनी इंग्लंडच्या मुजोरपणावर देखील बोट ठेवत इंग्लंड आपली बॅझबॉल रणनिती सोडणार नाही असंही म्हणाले.
बेन स्टोक्सपेक्षा रोहितकडे जास्त संयम आहे. त्याने पहिली कसोटी गमावल्यानंतरही संयम दाखवत पुढच्या दोन कसोटी जिंकल्या.
इंग्लंडची आता जी अवस्था झाली आहे त्याला ते स्वतः जबाबदार आहेत. पाचव्या कसोटीत ते सकाळी चांगल्या स्थितीत होते. जर त्यांनी टिकून राहत आव्हानात्मक धावसंख्या उभारणे गरजेचे होते.
पाचव्या कसोटीचा पहिला दिवस भारताचा राहिला. त्यांनी चांगली फलंदाजी केली असून आतापर्यंत ही कसोटी मालिका एकतर्फीच झाली आहे. पहिल्या कसोटीचा अपवाद वगळता भारतीय संघाने वर्चस्व गाजवलं आहे.