सकाळ डिजिटल टीम
Honeymoon Destinations in India : आजकाल प्रत्येक जोडप्यामध्ये लग्नानंतर हनिमूनला जाण्याचा ट्रेंड आहे. काही लोकांचं बजेट इतकं असतं की, ते परदेशात हनिमून साजरा करणं पसंत करतात, तर काही कपल्स कमी बजेटमध्ये चांगल्या ठिकाणी फिरणं पसंत करतात. आज आम्ही तुम्हाला भारतातील हनिमूनसाठी सर्वोत्तम ठिकाणांबद्दलची माहिती देऊ..
हिमाचल प्रदेश : जर तुम्ही हनिमूनसाठी कुठेतरी जाण्याचा विचार करत असाल तर हिमाचलमध्ये कुल्लू मनाली, शिमला अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथं तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत फिरू शकता.
मसूरी : उत्तराखंडमध्ये वसलेली हिल्सची राणी मसुरी विवाहित जोडप्यांसाठी उत्तम पर्याय आहे. इथं तुम्ही कमी बजेटमध्येही तुमच्या जोडीदारासोबत आलिशान पद्धतीनं रोमँटिक हनीमून साजरा करू शकता.
तामिळनाडू : तामिळनाडूमधील उटी हे जोडप्यांसाठी सर्वोत्तम पर्याय ठरेल. इथला निसर्ग इतका सुंदर आहे की, लोकांना हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी वाटणार नाही.
केरळ : अलेप्पी, केरळमध्ये देखील तुम्ही तुमचा रोमँटिक हनीमून साजरा करू शकता. निसर्ग अनुकूल असण्यासोबतच हे ठिकाण बजेटमध्ये देखील आहे.
कुर्ग : रोमँटिक ठिकाणासोबत बजेटचीही काळजी घेत असाल, तर कर्नाटकातील कुर्गमध्ये तुमचा हनिमून साजरा करू शकता.
अंदमान बेट : आजकाल बहुतेक जोडपी हनीमूनसाठी अंदमान बेटावर जाणं पसंत करतात.
दार्जिलिंग : पश्चिम बंगालमध्ये स्थित दार्जिलिंग हे जोडप्यांसाठी रोमँटिक ठिकाण आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.