सकाळ डिजिटल टीम
मेकअप केल्यामुळे आपला चेहरा अधिक आकर्षक दिसतो.
अनेकींना स्वतःचा मेकअप स्वतःच करायला आवडतं.
ऑफिस किंवा कॉलेजमध्ये जाताना देखील स्त्रिया आणि मुली मेकअप करणं पसंत करतात.
मेकअपमध्ये छोटीशी जरी चुक झाली तर त्याचा थेट परिणाम तुमच्या लुकवर पडतो.
आजच्या काळात ब्युटी ब्लेंडर हा प्रत्येकाच्या मेकअप किटचा भाग बनला आहे.
हा ब्युटी ब्लेंडर स्पंज वापरण्याआधी फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवला आणि नंतर त्याने चेहऱ्यावर मेकअप लावला तर त्याचे अनेक फायदे मिळतात.
स्किन पोर्स टायटनिंग करण्यास मदत होते, मेकअप चेहऱ्यावर छान सेट होतो. तसेच त्वचेवर असलेल्या बारीक रेषा आणि सुरकुत्या देखील कमी दिसतात.
मेकअप ब्लेंड होण्यासाठी ब्युटी ब्लेंडर फ्रिजमध्ये ठेवणे गरजेचे असते. मेकअपला एक स्मूद, आणि गुळगुळीत लूक मिळतो.
थंड ब्युटी ब्लेंडर स्किन पोर्सना टाईट करते, त्वचेमधून तेल लवकर चेहऱ्यावर येत नाही. यामुळे मेकअप बराच काळ टिकतो. तसेच चेहऱ्यावर चमक येते.
तुम्ही सुद्धा ही ट्रिक करून पहा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.