Beauty Tips : 'या' ५ उपायांनी घराच्या घरी घालवा पिंपल्स

सकाळ डिजिटल टीम

त्वचेचा टोन, हार्मोनल बदल, आहाराची कमतरता अशा कारणाने फक्त चेहऱ्यावरच नाही तर शरीराच्या कोणत्याही भागावर पिंपल्स येऊ शकतात.

पिंपल्स असो किंवा इतर कोणतंही प्रॉडक्ड असो चेहऱ्यावर काहीही लावण्याआधी चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.

धुतल्यावर ओपन झालेले पोअर्स बंद करण्यासाठी टोनर लावा.

बऱ्याचदा पेन रिलीफ बाम हा पिंपल्सवर उत्तम उपाय ठरू शकतो. हलक्या हाताने पिंपलवर रात्री बाम चोळा मग सकाळी उठल्यावर पिंपल सुकलेले असेल.

टूथपेस्ट पिंपलवर परिणामकारक असते हे बऱ्याच लोकांना माहित आहे. पिंपलवर आलेली सूज यामुळे कमी होऊन पिंपल आकुंचन पावते. यात जेल टूथपेस्ट वापरू नये.

चिमूटभर हळदीत गुलाबजल घालून घट्ट पेस्ट बनवून पिंपलवर रात्री लावून झोपा. सकाळी पिंपल पूर्ण पिकून त्याला तोंड फुटले असेल.

जर पिंपलमुळे आग होत असेल तर त्यावर बर्फ चोळा. त्यामुळे आग कमी होऊन त्या भोवतीचं तेल, घाण साफ होईल.

पिंपलची सूज कमी करण्यासाठी रात्री झोपताना लसणाचा रस लावा. सकाळी सूज उरलेली असते. शिवाय रात्री झोपण्यापूर्वी लसणाची एक कळी अर्धी कापून ती पिंपलवर चोळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.