'या' सोप्या पद्धतींनी घरीच बनवा लिपस्टिक... जाणून घ्या

Aishwarya Musale

लिपस्टिक

जेव्हाही आपण मेकअपच्या काही वस्तू खरेदी करायला जातो तेव्हा आपण लिपस्टिकच्या वेगवेगळ्या शेड्स नक्कीच ट्राय करतो. कारण लिपस्टिकशिवाय मेकअप पूर्ण दिसत नाही. परंतु अशा अनेक लिपस्टिक आहेत ज्या खूप महाग आहेत.

जर तुम्हाला लिपस्टिक लावायला आवडतं, मात्र त्यावर जास्त पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल; तर तुम्ही घरच्या घरीच लिपस्टिक बनवू शकता.

विशेष म्हणजे, यामध्ये वापरल्या जाणाऱ्या गोष्टींमुळे हानीकारक केमिकल्सची भीतीही राहत नाही, जे कदाचित महागड्या ब्रँड्सच्या लिपस्टिकमध्ये असू शकतात.

लागणारे साहित्य

लिपस्टिक कलर, ब्रश, व्हॅसलीन - 1 टीस्पून, सनस्क्रीन - 1/4 चमचे, कॉम्पॅक्ट पावडर - 1 टीस्पून, इसेंशियल ऑईल - 2-3 थेंब

लिपस्टिक कशी बनवायची

यासाठी सर्वप्रथम एक वाटी घ्यावी लागेल. आता त्यात व्हॅसलीन टाकावे लागेल.

नंतर त्यात सनस्क्रीन टाका आणि दोन्ही गोष्टी नीट मिसळा. आता त्यात कॉम्पॅक्ट पावडर टाकायची आहे. यानंतर, तुम्हाला ज्या रंगाची लिक्विड लिपस्टिक बनवायची आहे तो कलर मिक्स करा.

आता त्यात इसेंशियल ऑईल घाला आणि सर्वकाही चांगले मिसळा. आता डबल बॉयलरच्या मदतीने ते वितळवा.

यानंतर एअर टाइट कंटेनरमध्ये ठेवा आणि सेट होऊ द्या. त्यानंतर ब्रशच्या मदतीने ओठांवर लावा.

वजन कमी करण्यासाठी कोणता ब्रेड सर्वात फायदेशीर? जाणून घ्या

bread | sakal
येथे क्लिक करा