चेहऱ्यावर हवाय ग्लो? नियमित या 2 आसनांचा करा सराव

Harshada Shirsekar

ब्युटी प्रोडक्ट

चेहरा सुंदर दिसावा यासाठी कित्येक जणी महागड्या केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर करतात. पण यामुळे चेहऱ्याच्या त्वचेचं नुकसान होतंय, हे लक्षात घ्या.

Yoga For Skin Glow | sakal

योगासने

याऐवजी नियमित काही योगासनांचा सराव केल्यास चेहऱ्यासह संपूर्ण शरीरास अगणित लाभ मिळतील.

Yoga For Skin Glow | sakal

रक्ताभिसरण प्रक्रिया

शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया योगरित्या सुरू नसल्यास कित्येस समस्या उद्भवू शकतात. यामुळे स्नायूं आखडणे, कमकुवत होणे इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात.

Yoga For Skin Glow | sakal

चेहऱ्याचा रंग

शरीरात रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होत नसल्यास त्वचेच्या रंगावरही याचा परिणाम होतो. या समस्येपासून सुटका हवी असल्यास काही आसनांचा नियमित सराव करावा.

Yoga For Skin Glow | sakal

सर्वांगासन

या आसनामुळे शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीत सुरू होण्यास मदत मिळू शकते. यामुळे चेहऱ्यावरील मुरूम, सुरकुत्यांची समस्या कमी होऊन चेहऱ्यावर तेज येते.

Yoga For Skin Glow | sakal

कसे करावे आसन?

सर्वप्रथम पाठीवर झोपावे. हळूहळू दोन्ही पाय आकाशाच्या बाजूनं वर उचलावेत. दोन्ही हाताच्या पंजांनी पाठीला आधार द्यावा. 

Yoga For Skin Glow | sakal

क्षमतेनुसार आसनाचा सराव करावा

आपल्या क्षमतेनुसार आसनाची अंतिम स्थिती धारण करावी. पाय गुडघ्यात दुमडू नये. जसे आसनाच्या अंतिम स्थितीत गेलात तसेच उलट्या क्रमाने आसन सोडावे.

Yoga For Skin Glow | sakal

हलासन 

सर्वप्रथम पाठीवर झोपा. यानंतर दोन्ही पाय वरील दिशेनं उचला व डोक्याच्या मागील बाजूस आणून पायाची बोटे जमिनीवर टेकवा. पण पाय गुडघ्यांमध्ये दुमडू नये. हात जमिनीवरच ठेवा.

Yoga For Skin Glow | sakal

खबरदारी

आपल्या क्षमतेनुसार अंतिम स्थितीत राहा व नंतर आसन सोडून द्यावे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार दोन्ही आसनांचा सराव करावा.

Yoga For Skin Glow | sakal

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yoga For Skin Glow | sakal