धनश्री भावसार-बगाडे
सुंदर दिसायला कोणाला आवडत नाही. प्रत्येक मुलीचे स्वप्न असते की, ती आहे त्यापेक्षा अधिक सुंदर कशी दिसेल.
मुली सुंदर दिसण्यासाठी काय काय नाही करत. पण या साध्या सोप्या गोष्टी ज्या सहसा फार कोणाला माहित नसतात.
बहुतांश मुलींना हे माहित नसेल की, रेशमी उशी घेऊन झोपल्याने फक्त केस तुटणेच कमी होत नाही तर चेहऱ्यावर येणारे बारीक पुरळंही येत नाहीत.
हे सुद्धा बऱ्याच जणांना माहित नसेल की, खोबरेल तेल आणि मधाचा मास्क केसांसाठी खूप उपयुक्त आहे. त्यात अँटीफंगल आणि अँटीबॅक्टोरीयल घटक असल्याने हे फ्रीझी हेअरसाठी फायदेशीर ठरते.
हेअर ग्रोथ आणि मजबुतीसाठी कोरफडीचा गर खूप उपयुक्त आहे. त्यामुळे झोपताना भुवयांना कोरफड लावल्याने भुवया जाड आणि डोळे सुंदर दिसतात.
वयानुसार त्वचेवर डलनेस येतो. तो उजळण्यासाठी फार काही नाही पण बर्फाने मसाज केला तर स्कीन उजळ आणि फ्रेश दिसते.
थंड कॅमोमाईल टी बॅग्ज डोळ्यांवर ठेवल्याने डार्क सर्कल्स कमी होतात.
ओठांचा काळेपणा जाऊन आकर्षक ओठांसाठी मध साखरेचा स्क्रब उत्तम उपाय ठरतो.
जर तुम्ही ग्रीन टी ने केस धुतलेत तर त्यांची चमक अधिक वाढते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.