Aishwarya Musale
सध्या घनदाट आयब्रोची फॅशन सुरू आहे. त्यामुळे डोळ्यांचे सौंदर्य तर वाढतेच पण आपल्या चेहऱ्यातही बराच फरक दिसतो.
लांबसडक आणि घनदाट आयब्रो मिळाव्यात यासाठी महिला बरेच उपाय करतात. काही तर महागड्या ट्रीटमेंटही करून घेतात.
तुम्हाला घनदाट भुवया हव्या असतील तर त्यावर एरंडेल तेल लावावे. या तेलाने केसांची वाढ जलद होते.
लांबसडक व घनदाट भुवया हव्या असतील तर तुम्ही भुवयांना बदामाचे तेलही लावू शकता. त्यामुळे केस खूप वेगाने वाढू लागतात. रात्री कापसाच्या बोळ्याने हे तेल भुवयांना लावा.
नारळाच्या तेलात व्हिटॅमिन ई हे मुबलक प्रमाणात असते. भुवयांना हे तेल नियमितपणे लावले तर भुवया घनदाट होण्यास मदत होते. काही दिवसात तुम्हाला फरक दिसून येईल.
यासाठी ऑलिव्ह ऑईलही अतिशय उपयुक्त ठरेल. त्याच्या नियमित वापराने भुवया घनदाट होऊ शकतील. रात्री झोपण्यापूर्वी हे तेल दररोज वापरल्यास फरक दिसून येतो.
वाचून आश्चर्य वाटेल पण दुधाच्या मदतीनेही भुवयांची वाढ चांगली होऊ शकते. यासाठी एक चमचा कच्चे दूध घेऊन, त्यात कापूस भिजवून तो भुवयांवर लावा ५ ते १० मिनिटे मसाज करा.
कांद्याचा रस लावल्यानेही भुवयाही जाड आणि घनदाट होऊ शकतात. दिवसातून दोनदा कांद्याचा रस भुवयांवर लावल्याने फायदा होऊ शकतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.