Harshada Shirsekar
आरोग्यासाठी जिऱ्याचे सेवन करणं फायदेशीर मानले जाते.
पण या गरम मसल्यातील पदार्थामुळे केसगळतीची समस्याही रोखली जाऊ शकते, हे तुम्हाला माहिती आहे का?
जिऱ्याच्या पाण्याचा वापर केल्यास केसांशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते.
केसांमधील उवा-लिखांपासून सुटका मिळवायची असल्यास जिऱ्याच्या पाण्याने केस धुऊन घ्या. कारण जिऱ्याच्या पाण्यामध्ये इंसेक्टिडियल गुणधर्म आहेत.
टाळूच्या त्वचेवरील खाज कमी करण्यासाठी जिऱ्याच्या पाण्याचा वापर करा. कारण यामध्ये अँटी- व्हायरल आणि अँटी-फंगल यासारखे गुणधर्म आहेत. ज्यामुळे डोक्याला येणारी खाज कमी होऊ शकते.
जिऱ्यातील औषधी पोषणतत्त्वांचा हेअर फॉलिकल्सना पुरवठा झाल्यास केसगळतीची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते.
जिऱ्याच्या पाण्यात अँटी फंगल, अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी- व्हायरल गुणधर्म असतात. ज्यामुळे कोंड्याची समस्या कमी होऊ शकते.
जिऱ्याच्या पाण्याने केस स्वच्छ धुतल्यास कोरड्या टाळूच्या त्वचेची समस्या कमी होण्यास मदत मिळेल व केसांची वाढही चांगली होईल.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.