Aishwarya Musale
आपली त्वचा चमकदार आणि सुंदर असावी असे आपल्या सर्वांनाच वाटते. वृद्धत्वाचा परिणाम आपल्या त्वचेवर होऊ नये. अशी आपली इच्छा असते.
रात्री झोपण्यापूर्वी त्वचेची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर त्वचा खराब होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया, रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला नैसर्गिक चमक देण्यासाठी काय करावे.
तुम्ही मेकअप करा किंवा न करा, पण तुमचा चेहरा व्यवस्थित स्वच्छ करा. दिवसभरातील धूळ, घाण यामुळे त्वचेवर मृत पेशी जमा होतात. रात्री झोपण्यापूर्वी त्यांना काढून टाकण्यासाठी डबल क्लिंजिंग करा.
मॉइश्चरायझर त्वचेची आर्द्रता लॉक करण्यास मदत करते. दिवसा आणि रात्री त्वचेची काळजी पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने केली पाहिजे.
तज्ज्ञांच्या मते, जेव्हाही आपण झोपतो तेव्हा आपल्या त्वचेतून आर्द्रता गायब होऊ लागते, त्याच ओलाव्याला लॉक करण्यासाठी मॉइश्चरायझरचा वापर केला जातो.
रात्री चेहरा धुतल्यानंतर, मऊ कापडाने आपला चेहरा हळूवारपणे पुसून टाका आणि नंतर त्वचेवर कोणतेही चांगले टोनर लावा. टोनर अल्कोहोलमुक्त असल्याची खात्री करा. अल्कोहोल फ्री टोनर प्रत्येक त्वचेसाठी योग्य आहे.
स्किन टोनरनंतर तुम्ही त्वचेवर सीरम वापरू शकता. सीरमचे एक किंवा दोन थेंब चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. सीरम चेहऱ्यावर सुरकुत्या येण्यापासून रोखण्यास मदत करते.
त्वचा चांगली ठेवण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणे खूप आवश्यक आहे. शरीरात पाण्याची कमतरता टाळण्यासाठी बटर मिल्क किंवा नारळाच्या पाण्याचे सेवन करणे देखील फायदेशीर ठरू शकते.