Swadesh Ghanekar
न्यूझीलंडच्या ग्रेग बार्क्ले यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( ICC) अध्यक्षपदाची तिसरी टर्म लढवणार नसल्याचे जाहीर केले.
BCCI सचिव जय शाह यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दबदबा पाहता आयसीसी अध्यक्षपदाच्या शर्यतीत त्यांच्याविरोधात कोणीच अर्ज केला नाही.
३५ वर्षीय जय शाह हे ICC चे नेतृत्व करणारे सर्वात तरुण व्यक्ती ठरले आहेत.
जागतिक स्तरावर क्रिकेटला आणखी मोठी उंची मिळवून देण्यासाठी मी ICC टीम आणि सदस्य देशांसोबत काम करण्यासाठी वचनबद्ध आहे.
शाह हे ऑक्टोबर २०१९ पासून बीसीसीआयचे सचिव आणि जानेवारी २०२१ पासून आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे आणि भारताचा तेथे खेळण्यास जाणार विरोध आहे.
जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर यांच्यानंतर आयसीसीचे नेतृत्व करणारे ते भारतातील पाचवे व्यक्ती आहेत.
आयसीसी अध्यक्षपदावर यापूर्वी शरद पवार व शशांक मनोहर हे दोन मराठी माणसं विराजमान झाली होती.