Saisimran Ghashi
बरेचदा असे होते की खूप व्यायाम करून देखील वजन कमी होत नाही किंवा पोटावरची चरबी कमी होत नाही.
कदाचित तुम्ही पुरेसा व्यायाम करत नाही किंवा तुमचा व्यायामाचा प्रकार पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्रभावी नाही.
नियमित व्यायामासोबतच तुम्ही तुमच्या आहारातही बदल करणे आवश्यक आहे. कॅलरीज कमी करणे आणि पौष्टिक आहार घेणे महत्त्वाचे आहे.
तणावमुळे कोर्टिसॉल हार्मोन वाढते, ज्यामुळे पोटाभोवती चरबी साठते.
पुरेशी झोप न घेतल्याने चयापचय मंदावते आणि पोटाची चरबी कमी करणे कठीण होते.
काही लोकांच्या शरीराची रचना अशी असते की त्यांना पोटाची चरबी कमी करणे कठीण जाते.
हार्मोनल असंतुलन पोटाभोवती चरबी साठण्याचे कारण असू शकते.
जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करण्यात अडचण येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.ही केवळ सामान्य माहिती आहे.आम्ही याची पुष्टी करत नाही.