Saisimran Ghashi
आजकाल अनेकांना पोट सुटण्याची समस्या जाणवते, पण वजन वाढत नाही. यामागे काही कारणे असू शकतात.
पचनक्रिया नीट न झाल्याने पोटात गॅस तयार होतो आणि पोट फुगलेले वाटते. पण खाल्लेले अंगी लागत नाही.
प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, कॅफीन आणि कार्बोनेटेड पेये पोट फुगण्याची समस्या वाढवू शकतात.
पाचन तंत्रातील समस्यांमुळेही पोट फुगते आणि खाल्लेले अंगी न लागल्यामुळे वजन वाढत नाही.
मानसिक तणाव आणि चिंता ही पोट फुगण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. यामुळे खाल्लेले अन्न शरीराला लागत नाही.
हार्मोनल असंतुलनही पोट फुगण्याचे कारण असू शकते.त्यामुळे वजनही वाढत नाही.
निदान करून योग्य उपचार घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांचा सल्ला घेऊन आहारात बदल करणे, व्यायाम करणे आणि तणाव व्यवस्थापित करणे यामुळे या समस्येवर नियंत्रण मिळवता येते.
ही फक्त सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय सल्ल्यासाठी कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.