Monika Lonkar –Kumbhar
बदामामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक आढळून येतात. बदाम आरोग्यासाठी, त्वचेसाठी आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर आहेत.
बदामाचे तेल हे त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे.
चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करण्यासाठी बदामाचे तेल लाभदायी आहे. रात्री झोपताना चेहऱ्यावर बदामाचे तेल नियमितपणे लावल्याने पिंपल्सची समस्या दूर होईल.
डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी रोज नियमितपणे बदाम तेलाने चेहऱ्यावर मसाज करा.
सूर्याच्या अतिनील किरणांमुळे आपली त्वचा डॅमेज होण्याचा धोका असतो. त्यामुळे हे डाग घालवण्यासाठी बदामाच्या तेलाने झोपताना चेहऱ्यावर मसाज करा.
बदामाच्या तेलामुळे कोरडी त्वचा रिपेअर होण्यास मदत होते. शिवाय, त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते.
बदामाच्या तेलाचा चेहऱ्यावर नियमित वापर केल्याे चेहरा उजळतो आणि त्वचा तजेलदार दिसण्यास मदत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.