Monika Lonkar –Kumbhar
अंजीर खायला आपल्या सगळ्यांनाच आवडते.
अंजीरमध्ये विविध प्रकारची पोषकतत्वे, खनिजे आणि फायबर्सचे भरपूर प्रमाण आढळते.
पिकलेले अंजीर, सुकवलेले अंजीर खाण्यासोबतच अंजीरचे पाणी प्यायल्याने ही आरोग्याला अनेक फायदे होतात. काय आहेत ते फायदे? चला तर मग जाणून घेऊयात.
अंजीरमध्ये उच्च क्षमतेचे फायबर्स आढळून येतात. त्यामुळे, पचनक्षमता सुधारते.
अंजीरच्या पाण्यात कॅलरीज कमी असतात, यामुळे पोट भरलेले राहते आणि भूक कमी होते आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
अंजीरच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार राहू शकते.
अंजीरच्या पाण्यात पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमसारखे खनिजे असतात, जे हृदयाचे आरोग्य सुधारतात.