Saisimran Ghashi
केस तुटण्याची समस्या ही खूपच त्रासदायक असते.
केस गळती थांबवण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. आम्ही तुम्हाला असाच एक रामबाण उपाय सांगणार आहे.
केस तुटण्यापासून वाचवण्यासाठी खोबरेल तेलात काही प्रभावी पदार्थ मिसळून लावता येतात.
मेथी दाणे केसांच्या मुळांना पोषण देतात आणि केस तुटणे थांबवतात. मेथी दाण्यांची पेस्ट तयार करून ती खोबरेल तेलात मिसळून केसांवर लावता येते.
या उपायाने तुमच्या केस गळतीच्या समस्येला नक्कीच ब्रेक लागेल.
हे मिश्रण तुमच्या केसांच्या मुळांवर आणि लांबीवर लावा. ह्याला 30 ते 45 मिनिटे ठेवून उबदार पाण्याने धुवा.
अशा प्रकारे खोबरेल तेलात मिसळून मेथी दाण्याची पेस्ट लावल्यास केसांचे आरोग्य सुधारते आणि ते तुटण्यापासून वाचवते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.