Monika Lonkar –Kumbhar
अॅव्होकॅडोज हे फळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.
अॅव्होकॅडोजमध्ये पोषकघटकांचे विपुल प्रमाण आढळते.
अॅव्होकॅडोज एलिगेटर नाशपाती म्हणून ही ओळखले जाते. आज आपण या फळांचे आरोग्याला होणारे विविध फायदे जाणून घेऊयात.
अॅव्होकॅडोजमध्ये फायबर्सचे भरपूर प्रमाण आढळते. त्यामुळे, पोट भरलेले राहते. वजन कमी करण्यसाठी अॅव्होकॅडोज सेवन जरूर करा.
या फळाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रीत राहण्यास मदत होते.
अॅव्होकॅडोजचे सेवन केल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते.
अॅव्होकॅडोजचे सेवन केल्याने हृदयाशी निगडीत रोगांचा धोका कमी होतो.
या फळामध्ये कॅल्शिअमचे भरपूर प्रमाण आढळते. त्यामुळे, हाडे मजबूत होण्यास मदत होते.