सकाळ डिजिटल टीम
ब्लॅक कॉफीचे सेवन केल्याने नैराश्य, चिंता, टेन्शन, जास्त झोप आणि सुस्ती इत्यादी कमी होतात आणि मेंदू सक्रिय राहतो.
ब्लॅक कॉफीमध्ये आढळणारे कॅफिन चयापचय वाढवते, ज्यामुळे अन्नातून ऊर्जा बनवण्याची प्रक्रिया सुधारते.
जर तुम्ही जिम किंवा व्यायामानंतर ब्लॅक कॉफीचे सेवन करत असाल तर स्टॅमिना वाढवण्यासाठी ब्लॅक कॉफी खूप उपयुक्त आहे.
ब्लॅक कॉफी हृदयासाठीही चांगली असते. दररोज 1 किंवा 2 कप ब्लॅक कॉफी प्यायल्याने स्ट्रोकसह कोणत्याही प्रकारच्या हृदयविकाराचा धोका कमी होतो.
ब्लॅक कॉफी मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत करते, ब्लॅक कॉफी शरीरात इन्सुलिन तयार करण्यास मदत करते.
मात्र ब्लॅक कॉफीचे सेवन रिकाम्या पोटी करू नये. तुम्ही नाश्ता केल्यानंतरच ती प्या.
ब्लॅक कॉफी कशी बनवावी? तर पहिल्यांदा पाणी उकळा आणि त्यात एक चमचा ब्लॅक कॉफी घाला. आता ते एका कपमध्ये ओतून प्या. झालं
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.