Monika Lonkar –Kumbhar
निरोगी जीवनशैलीसाठी नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे
शारिरीक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी शरीर तंदूरूस्त असणे गरजेचे आहे.
आजकाल लोक फिटनेस उत्तम प्रकारे राखण्यासाठी जिमला जातात, योगा करतात, चालायला जातात किंवा घरीच व्यायाम करतात.
सामान्य चालण्यापेक्षा ब्रिस्क वॉक हे जरा वेगळे आहे. या ब्रिस्क वॉकिंगमध्ये तुम्ही खूप वेगाने चालत नाही आणि खूप हळू देखील चालत नाही, यालाच ब्रिस्क वॉक असे म्हटले जाते.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी ब्रिस्क वॉक अतिशय फायदेशीर आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दररोज ब्रिस्क वॉक केल्याने मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
दररोज ब्रिस्क वॉकिंग केल्याने शरीरातील स्नायू मजबूत होतात आणि कॅलरीज लवकर बर्न होतात.