सकाळ डिजिटल टीम
उन्हाळ्यात नारळ पाणी पिणे शरीरासाठी खुप चांगले असते.
नारळ पाणी पिऊन शरीर हायड्रेट राहते. नारळ पाणी शरीरात पाण्याची कमतरता भासू देत नाही.
अनेक लोक नारळ पाणी पिऊन नारळ फेकून देतात.
परंतु नारळात असलेली मलई शरीरासाठी फायदेशीर असते.
नारळातील मलई खाल्याने वजन कमी होते. तसेच ही मलई खाल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते.
नारळाच्या मलईमध्ये फायबर असते, त्यामुळे नारळाची मलाई खाल्याने पचनशक्ती वाढते.
नारळाच्या मलाईमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि मॅंगनीजसारखे पोषक घटक असतात. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकार क्षमता वाढते.
चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येते आणि शरीराला थकवा जाणवत नाही.
नारळाची मलई खाल्ल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होते.
मलई खाल्याने शरीरातील उष्णता कमी होते.
आयपीएल मॅच पाहताना घ्या 'या' स्वादिष्ट स्नॅक्सचा आस्वाद