सकाळ डिजिटल टीम
आपण नेहमीच भाजीवर किंवा चपातीवर तूप टाकून खातो, परंतु गरम पाण्यात एक चमचा तूप टाकून प्यायल्याने कोणते फायदे होतात हे तुम्हाला माहित आहे का? जाणून घेऊयात ७ फायदे
तुपात असलेले नैसर्गिक मॉइश्चरायझिंग गुणधर्मांमुळे त्वचेला पोषण मिळते. गरम पाण्यासोबत तूपाचे सेवन केल्याने त्वचेवर चमक येते.
रिकाम्या पोटी तूप सेवन केल्याने शरीराला ऊब मिळते आणि ताप, सर्दी यांसारखे संसर्गजन्य रोग बरे होतात. घसादुखीपासूनही आराम मिळतो.
कोमट पाण्यासोबत तुपाचे सेवन केल्याने मेंदूला पुरेशा प्रमाणात फॅट्स मिळतात. तसेच देशी तूप मेंदूला हायड्रेट ठेवते आणि एकाग्रता सुधारण्यास मदत करते.
देशी तूप गरम पाण्यात मिसळून प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत होते.
देशी तूप डोळ्यांना थंडावा देण्याचे काम करते. यामध्ये असलेले ओमेगा ३ फॅटी ॲसिड डोळ्यांतील कोरडेपणा आणि डोळ्यांचा थकवा यांसारख्या दृष्टी संबंधित समस्या कमी करण्यास मदत करते.
गरम पाण्यात तूप टाकून प्यायल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो, तसेच अन्नाचे पचन व्यवस्थित होते.
गरम पाण्यात तूप मिसळून प्यायल्याने शरीरातील हानिकारक कण, शरीरासाठी उपयुक्त नसलेले पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे शरीर निरोगी रहाण्यास मदत होते.