Monika Lonkar –Kumbhar
प्रथिनांचा उत्तम स्त्रोत म्हणून काबूली चण्याला खास करून ओळखले जाते.
काबूली चण्यापासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात.
काबूली चण्यांमध्ये पोषकतत्वांचे विपुल प्रमाण आढळते.
काबूली चण्यांमध्ये लोहाचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, त्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
काबूली चण्यांचे सेवन केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. त्यामुळे, भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहते.
काबूली चण्यामध्ये झिंक, लोह आणि व्हिटॅमिन्सचे भरपूर प्रमाण आढळते. हे घटक हाडांच्या मजबूतीसाठी फायदेशीर ठरतात.
काबूली चण्यांमध्ये असलेले फायबर्स रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवतात. त्यामुळे, हृदयाचे आरोग्य निरोगी राहते.