दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात वरणभात खाण्याचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

Monika Lonkar –Kumbhar

वरणभात

देशातील प्रत्येक राज्यातील खाद्यसंस्कृती जरी वेगळी असली तरी डाळ-भात किंवा वरणभात हा पदार्थ कुणाला माहित नाही, असे होऊच शकत नाही. आपल्या देशात क्वचितच कोणी असेल की ज्याने अजूनपर्यंत वरणभात खाल्ला नसेल. 

Health Care

आपल्या भारतात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. त्यापैकी एक असलेला हा वरणभात लोक आवडीने खातात.

Health Care

आरोग्यासाठी लाभदायी

वरणभात हा पदार्थ पचायला हलका आणि तितकाच पोषकतत्वांनी परिपूर्ण आहे. हा वरणभात अनेक जण दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात आवर्जून खातात. हा हलका आहार घेतल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात.

Health Care

हृदयासाठी फायदेशीर

काही आरोग्य तज्ज्ञांच्या मते रात्रीच्या जेवणात किंवा दुपारच्या जेवणात वरणभाताचे सेवन केल्याने हृदयाशी संबंधित असलेले आजार होण्याची शक्यता कमी होते. यासोबतच हा पचायला हलका आणि पौष्टिक असलेला आहार आपला मूड चांगला ठेवण्यास मदत करते. 

Health Care

ज्या लोकांना फिट रहायचे आहे, अशा लोकांनी रात्रीच्या जेवणात वरणभाताचा जरूर समावेश करावा.

Health Care

हाडांना मिळते मजबूती

तांदूळ आणि डाळींमध्ये प्रथिने आणि कॅल्शिअमचे भरपूर प्रमाण आढळून येते. या पोषकघटकांमुळे शरीरातील मांसपेशींना आणि हाडांना मजबूती मिळते. वरणभातातील या पोषकघटकांमुळे दातांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. शक्यतो वरणभात खाताना त्यात डाळींचे प्रमाण अधिक असणे, हे फार महत्वाचे आहे.

Health Care

वजन कमी करण्यासाठी लाभदायी

वरणभातामुळे आपल्या शरीराची चयापचय क्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. त्यामुळे, पोटाच्या समस्या जसे की, गॅसेस, अपचन, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. शिवाय, वरणभातामुळे कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. ज्यांना वजन कमी करायचे आहे? अशा लोकांनी त्यांच्या आहारात वरणभाताचा जरूर समावेश करावा.

Health Care

हिवाळ्यातील सुपरफूड आहे ब्रोकोली, जाणून घ्या 'हे' फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Benefits of Broccoli | esakal
येथे क्लिक करा.