Monika Lonkar –Kumbhar
निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहारासोबतच नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.
अनेक जण सकाळी व्यायाम करतात. परंतु, कामाच्या व्यस्त शेड्यूलमुळे काहींना सकाळी व्यायाम, वर्कआऊट करायला वेळ मिळत नाही.
सकाळी व्यायाम करायला वेळ नसल्यामुळे, अनेक जण सायंकाळी व्यायाम करतात. सायंकाळी व्यायाम करण्याचे फायदे कोणते? जाणून घेऊयात.
संध्याकाळी स्नायूंची ताकद आणि लवचिकता हायपिकवर असते. त्यामुळे, सायंकाळी व्यायाम केल्याने मांसपेशी मजबूत होतात.
सायंकाळी वर्कआऊट केल्याने ताण कमी होण्यास मदत होते आणि मूड सुधारतो.
संध्याकाळी व्यायाम केल्याने इंन्सुलिनची संवेदनशीलता वाढू शकते, जी रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक आहे.
संशोधनानुसार, सायंकाळी वर्कआऊट केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.