Monika Lonkar –Kumbhar
तूपाचा आपल्या आहारात समावेश असणे, हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.
परंतु, तुम्हाला माहित आहे का? की, तूप खाणे आपल्या आरोग्यासोबतच त्वचेसाठी आणि केसांसाठी लाभदायी आहे.
तूपामध्ये व्हिटॅमिन ए, के, ई असते. तूपाचे सेवन केल्याने आपले केस चांगले होतात.
जर तुमच्या केसांमध्ये प्रचंड कोंडा झाला असेल तर, तूपात-बदाम तेल मिसळून त्याने केसांची मालिश करा. यामुळे, फरक पडेल.
जर तुम्हाला केसांना छान चमक हवी असेल तर, कोमट तूप करून ते केसांना लावा. त्यानंतर, अर्ध्या तासाने केस धुवा.
रात्रभर केसांना छान कंडिशनिंग करायचे असेल तर तुम्ही तूपाचा वापर करू शकता. त्यानंतर, केस धुवा.
केसांच्या उत्तम वाढीसाठी तूपात कांद्याचा अन् आवळ्याचा रस मिसळून तूप केसांना लावा. त्यानंतर केस धुवा.