Monika Lonkar –Kumbhar
ग्रीन टी हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानला जातो.
अनेक जण वजन कमी करण्यासाठी या चहाचा डेली रूटीनमध्ये समावेश करतात. वजन कमी करण्याव्यतिरिक्त या ग्रीन टी चे आरोग्याला अनेक फायदे आहेत.
ग्रीन टी मध्ये विपुल प्रमाणात पोषकतत्वांचे प्रमाण आढळून येते.
ग्रीन टी चे सेवन करणे हे मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
ग्रीन टीमध्ये अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म आढळतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायी ठरतात.
काही संशोधनानुसार, ग्रीन टी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.
ग्रीन टीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात.